संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:-दि.१७ व १८ऑगष्ट रोजी शहरातील प्रशिध्द सोनु मंगलम् येथे घाटंजी फोटोग्राफर बहूउदेशिय सामाजिक संस्था ०३६/२४ च्या वतिने भव्य विदर्भ स्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते. विदर्भातील लुप्त होणा-या लोककला जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व फोटोग्राफी हि कला व्यवसायीकांपर्यत ती सादर करण्यासाठी कीती मेहनत लागते हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही स्पर्धा प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.१७ तारखेला प्रदर्शनीचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून जितेंद्र मोघे कॉग्रेस सरचिटनीस, प्रमुख पाहूणे सुनिल देढे,कलाशिक्षक राहूल वानखेडे, पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी अनंत नखाते पाटील,किशोर ठाकरे फोटोग्राफर संस्था अध्यक्ष हे होते.तर दि.१८ ला बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष माजी आमदार राजु तोडसाम, प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भविर कन्या क्रांतीताई जम्बूंतराव धोटे, कैलास कोरवते,बंडू तोडसाम, मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार, बांधकाम कामगार यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणारे विष्णू उकंडे, महेश पवार व ईतर मान्यवर मंचकावर उपस्थित होते. कार्यक्रमात व्यावसायिक गटात प्रथम पारितोषिक २१०००/ रु मैयूर बोरकर व्दितीय देवेंद्र साखरकर चंद्रपूर १५०००/ प्रोत्साहन पर यश धाडवे आर्णी ७०००/रु यांनी पटकावली.द्वितीय गट हौशी मधे कमलखेडे नागपूर प्रथम ११०००/ व्दितीय यश भोरे घाटंजी ७०००/तर प्रोत्साहन पर अंकीत गुजर ५०००/ यांनी पटकाविले.विशेष प्रोत्साहन पर मधे महेश भुरे यवतमाळ, नितीन कटकतलवारे यवतमाळ,निल बोईनवार वणी यांना देण्यात आली. कार्यक्रम विशेष म्हणजे पुसद येथिल मॅक्रो छायाचित्रकार आसेगावकर यांच्या विवीध फुलपाखरू,मधमाशी,सोनपाखरू व ईतर रंगीबेरंगी छायाचित्रांनी कला प्रदर्शिनीत उपस्थितांचे डोळाचे पारणे फेडले.तर व विवीध विषयावर आधारीत छायाचित्र स्पर्धा प्रदर्शनी घाटंजीत प्रथमच लागल्याने जणतेचाही उत्तम प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वितेसाठी फोटोग्राफी संस्था अध्यक्ष किशोर ठाकरे, उपाध्यक्ष अजिंक्य रूईकर,आशिष भोयर,मनिष राठोड,नासिर शेख,रवि भोजवार,अमित डंभारे, संदिप धांदे,निवृत्ती बाभुळकर, दादाराव राठोड,निखील पवार,अमोल वारंजे,राजु इंगोले,यश ठाकरे, सागर भरणे, मयूर खंडारकर सह सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम सुत्रबध्द संचालन सचिव सचिन कर्णेवार यांनी केले उपस्थितांचे आभार कपील नगराळे यांनी मानले.