गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :- दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता पोलीस स्टेशन नांदुरा येथे शांतता समितीची बैठक चे आयोजन करण्यात आलेले होते त्यात सध्या राज्यात व देशात सुरु असलेल्या विवादीत प्रश्न मुद्देवर सर्वांनी चर्चा केली ज्यात बांगला देशात हिंदू धार्मियावर होणारे आत्याचार आणि रामगिरी महाराज यांचे विवादीत बयान, कलकत्ता येथील बलत्कार प्रकरण या विषयांना अनुसरून सर्वांनी शहरात शांतता ठेवावे, सोशल मीडिया वरील अफवावर विश्वास ठेवू नये अफवा पसरवू नये तरुण मुले यांना ही योग्य समज द्यावे बाहेरील जिल्ह्यातील राज्यातील घटनांचा प्रभाव नांदुरा मध्ये घडू नये व सामाजिक एकोपा बाधित होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावे, तसेच मनाई आदेश लागू असल्याने ५ किंवा ५ पेक्षा जास्त इसम विना परवानगीने एकत्र येवू नये, मिरवणूक काढूनये वाद्य डीजे वाजवू नये, जबरजर्स्तीने दुकानें व्यापार कोणीही बंद करू नये व्यापारी गरीब दुकानदार यांना त्रास देवू नये, मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची ही सर्वांना जाणीव करून शहरामध्ये जातीय सलोखा आबाधित ठेवण्याचे आवाहन नांदुरा पोलिसांनी व सर्व शांतता कमिटीच्या सदस्यांनी जनतेस केलेले आहे, शांतता कमिटी मिटिंग मध्ये सुधीर मुरेकर, ब्राह्मणद चौधरी, रामसिंग ठाकूर, अमोल डहाके, सुरेश पेठकर, रहेमान कुरेशी, सलीम भाई मंडपवाले, मोहतेशाम रिझवी, नवाब जिया उल्लाहखान, इकरामोद्दीन भाई, अन्वर बाबा पहेलवान, डॉक्टर अमीन, पत्रकार राजिक, बाळासाहेब पवार, अशोक अवचार, असीम खान, अमीन भाई यांनी ही सहभाग घेवून शांतता सुव्यवस्था नाणंदने व सदैव आबाधित ठेवणे याबाबत पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांनी आवाहन केले आहे,











