संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:-तालुक्यातील शिरोली येथे बाबासाहेब देशमुख विद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी वर्ग ८ वी ते १० व्या वर्गातील एकूण ११० विद्यार्थांनी वृक्ष लागवड कार्यक्रमात भाग घेतला.सर्व उपस्थित विद्यार्थांना या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमात नवचैतन्य संस्था, शिरोली व मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्याचे वृक्ष लागवडी करिता वेगवेगळे गट तयार करण्यात आले.तयार झालेल्या गटामध्ये मुलाचे १० व मुलीच्या १० गटातील विद्यार्थ्यांत गाणे घेऊन चैतन्य निर्माण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे शुभहस्ते कडुलिंब, पिंपळ, वड, करंज, उंबर, पाकडी अशा एकूण १८ झाडे लागवडी करिता देवून लागवड करून घेण्यात आली. ही सर्व झाडे नवचैतन्य संस्थेच्या रोपवाटीका येथे तयार करण्यात आली होती. झाडे तयार करतांना लागणाऱ्या पंन्या ह्या घरगुती वापर करून टाकलेल्या, ज्यात अगरबत्ती पुडे, विमजेल चे पाऊच, तेलाचे पॉकिट, अशा पण्यात रोपे तयार करण्यात आलेली होती.झाडे लावून झाल्यावर त्या झाडांना विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने काटेरी कुंपण करून घेतले हे विशेष. हे काम करतांना सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यावर लक्ष्य ठेवून होते.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात करिता एम. एन. गेडाम मु .अ ,एस. आर. मादेशवार,व्ही.व्ही.पाटिल, बि.एस.आडे,ए.डब्ल्यु बन्सोड कु.एम.आर.परतेकी मॅ. कुणाल मुत्यलवार, सार्थक वसेकर,एम.बि.मंचलवार लिपीक तसेच नवचैतन्य संस्था राहुल जीवने, समन्वयक अनिल बावणे या सर्वानी प्रयत्न केले. तर या कार्यक्रमा करिता मुख्य मार्गदर्शक सुभाषजी मानकर हे होते.











