महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.18:- ग्राम जिवन विकास संस्था चिचाळा ता देवळी जिल्हा वर्धा व्दारा संचालीत देवळी कमला नेहरू मागसवर्गीय मुलीचे वसतीगृह देवळी येथे पुण्यश्लोक राजमाता अष्टावधानी लोकमाता रणरागिणी कर्मयोगीनी दिन दुबळयांची त्राता पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अशोक दि. जाधव अध्यक्ष महाराष्ट्र शासन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहू फुले आंबेडकर पुरस्कार प्राप्त साईबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पिटीगुडा नं 1 तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी एस एफ राठोड वसतीगृह अधिक्षीका मॅडम व उपाध्यक्ष दिगाबर जाधव कोषाध्यक्ष तानुबाई जाधव रिकबचंद एस पाटील सदस्य होते सर्व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून पुजन करण्यात आले.अध्यक्षभाषणात अध्यक्ष साईबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पिटीगुडा जाधव यांनी पिंडधारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर फोटो बघितल्यावर कोणी ही त्यांचे दर्शन होईल व निघून जाईल मात्र घोड्यावर स्वार युद्धात करताना महाराणी अहिल्याबाई बधीतल्यावर नंतर त्यांच इतिहास जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण आपल्या पध्दतीने धडपड सुरू होईल आणि आपल्या अहिल्याबाई इतिहास डोळ्यासमोर ठेवून समोर येईल तेव्हा त्यांनी केले कार्य सर्व पर्यंत पोहोचली पाहिजे सध्यस्थितीत महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास आपल्या समाज बांधवांना पर्यंत पोहोचले नाही तब्बल 30 वर्षे राज्यकारभार चालविणारी स्त्री नुसती हातात पिंड घेऊन होम हवन करू शकत नाही तर तिला आपल्याला प्रजा रक्षणासाठी सुध्दा जबाबदारी पार पाडावी लागते आणि ती जबाबदारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर समर्थ पणे पार पाडली कुठल्या युद्धात हारले नाही नेहमीच विजयी झालेल्या आहेत यांच्या पराक्रमावर व स्त्री,आदर या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून एस एफ राठोड वसतीगृह अधिक्षीका मॅडम यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणजे पराक्रमीची पराकाष्ठा, एक उत्कृष्ट व्यवस्थापक पर स्त्री आदर शिकवणारे सर्वधर्म समभाव शिकवणारे एक आदर्श लोकमाता रणरागिणी कर्मयोगीनी या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली.आहिल्यिबाई दिलेली शिकवण आपण सर्वांनी अंगिकारावी ते आपले कर्तव्य आहे. असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी भाषणं कु प्रेरणा वंजारी व श्रावस्ती भगत ,आस्था साठे श्रावणी कांबळे सानिया डोंगरे,परी मुगले, काजल डोंगरे , यांनी केले त्यानंतर विद्यार्थीनींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपट सादर केली चांगले भाषणे झाली त्यात साक्षी पिंपराडे यांनी सुत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन किर्ती कुसवा यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित कु डी एस दुपारे स्वयंपाकी ,के आर परीसे चौकीदार यांनी उपस्थित होते.