बिहारीलाल राजपुत तालुका प्रतिनिधी भोकरदन
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागा मार्फत प्रत्येक जिल्ह्यातून दरवर्षी शंभर कलावंताची निवड होऊन राजर्षि शाहु महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने अंतर्गत कलावंतांना दरमहा पाच हजाराचे मानधन दिले जाते. ही योजना मागील पंचवीस वर्षा पुर्वीपासून सुरू आहे.सद्यस्थितीत कलावंत मानधनात वाढ झाल्याने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कलावंत मानधना साठी गेल्या तीन वर्षापासून फाईली भरत आहे,परंतू जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या डावपेचामुळे व रस्सीखेच कृत्यामुळे तीन वर्षांत मानधन समितीची एकही बैठक न झाल्याने कलावंतांच्या फाईली पंचायत समिती भोकरदन व समाज कल्याण विभागा जालना येथे धुळ खात पडून आहे. मानधन मंजुर समिती ही पालकमंत्री यांचे कडून गठीत केली जाते.अलीकडेच राजकीय घडामोडी मुळे राज्य शासनाच्या मंत्री मंडळात फेरबदल झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले, त्यामुळे जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांचा फेरबदल झाला यात काही दिवस जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सध्याचे आमदार व माजी मंत्री राजेश भैय्या टोपे यांची वर्णी लागली होती. त्यांनी त्यांच्या मर्जीतील लोककलावंतांची निवड करून जिल्हास्तरावर वयोवृद्ध कलावंत मानधन समिती गठित केली होती.सदर समितीचा कार्यकाळ संपायच्या आधीच जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले व त्यांनी त्यांच्या मर्जीतील नवीन समिती गठीत केली. तेव्हा अगोदरच्या समितीचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने सदर कमिटी ही न्यायालयात गेली व आमचा कार्यकाळ पूर्ण न होता दुसरी कमिटी का गठीत केली असा प्रस्ताव त्यांनी न्यायालयात दाखल केला तेव्हा न्यायालयाने त्यांच्या प्रस्तावाची दखल घेऊन पुनश: फेरविचार करण्यात यावा व हीच कमिटी पुढे कायम करावी असा निकाल दिला.यामुळे नवीन वयोवृद्ध मानधन समिती व जुनी वयोवृद्ध मानधन समिती यांच्यामध्ये वाद सुरू झाला व या वादामध्ये आमदार खासदार मंत्री यांनी उडी घेतली.आता काही दिवसावरच विधानसभा येऊन ठेपली आहे, तेंव्हा आपल्या तालुक्यातील कलाकारांचे मानधन मंजुरीचे कामे आम्हीच केलीत म्हणून श्रेय लाटण्यासाठी आमदार खासदार मंत्री हे कलाकारांच्या जीवनाशी खेळत आहे.अर्ज केलेले बरेच कलाकार चार वर्षांमध्ये मानधनाची अपेक्षा करता करता स्वर्गवासी झाले आहे,तेव्हा याला जबाबदार कोण ॽ शासन,आमदार खासदार, की पालक मंत्री ॽ जे ही असतील त्यांना शोधून पाहिलं पाहिजे असा सुर जिल्ह्यातील सर्व कलावंताच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. सन 2021, 2022, 2023, 2024 या वर्षांमध्ये जवळपास 300 पात्र लोक कलावंतांचे मानधन मंजुर करावयाचे होते, परंतु नव्या जुन्या समितीमध्ये 300 कलाकारांचे मानधन मंजुरीसाठी दोन्ही समितीनी दिडशे दिडशे करावे असा समझौता सुरु आहे. ह्यामध्ये दोन्हीही समित्या राजकीय आश्रीत असून ज्या त्या पक्षाचे कलावंत ज्यांनी त्यांनी काढावे असे ठरल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. कलावंताना जात पात धर्म पंथ किंवा पक्ष नसतो हे खरे असेलही पण जे खरे कलावंत आहे पंरतु कोणत्याही पक्षाचे नाही त्यांच्या अर्जाचे काय होईल ॽ ते कोणत्याही पक्षाचे नाही म्हणून ते मानधनापासून वंचीतच राहणार काय असा सवाल कलावंताच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.मानधन मंजुर समिती जुनी असो किंवा नवी,खरे कलावंत मानधन लाभापासून वंचीत राहून राजाश्रीत खोट्या अर्जदारांना मानधन सुरु केल्याचे निदर्शनास आल्यास लोककलावंत शाहीर राजकुमार राजपूत,करणी सेना प्रदेश प्रवक्ता,सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक वीर शिरोमणी वार्तापत्राचे उपसंपादक ,हे सर्व जालना जिल्ह्यातील कलावंताना संघटित करून तीव्र आंदोलन छेडणार आहे.व ज्यांनी वृद्ध कलावंतांच्या प्रस्ताव मंजुरीसाठी “खोडा ” घातला त्यांच्या विधानसभा मतदारसंघात जाऊन सर्व कलावंतासह संघर्षाचा उठाव करुन कलावंतांवर अन्याय केला म्हणुन जन जागृतीद्वारे आम्ही नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखऊ असा गर्भित इशाराही राजकुमार राजपुत यांनी दिला आहे.त्यासाठी वेळीच प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून वयोवृद्ध शाहीर कलावंतांच्या फाईली निकाली काढाव्यात व त्यांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे असेशाहीर राजकुमार राजपूत लोक कलावंत यांनी दैनिक अधिकारनामाचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.











