महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.19:- तालुक्यातील प्रसिद्ध भद्रणाग मंदिर येथुन “वारी प्रबोधनाची” अभियानाला उत्साहात सुरुवात झाली. वारीच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भाऊसाहेब थुटे, देठे गुरुजी, गुंडवार जी, रवी दादा मानव, संचालक श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल मोझरी, राज दादा घुमनर (युवा प्रबोधनकार यवतमाळ), नरेंद्र दादा जीवतोडे, अस्वले सर, दिलीप भाऊ, भोयर, आकाश तविंदे, दीपक जी नर्तम, प्रज्वल तोंगे, वरोरा, आणि वणी व कोरपना येथून आलेल्या हजारो गुरुदेव सेवकांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.वारीच्या प्रचार रथाने लोकमान्य शाळा, तहसील कार्यालय येथे निवेदन दिले आणि मल्हारी बाबा सोसायटी, गोवराळा, श्रीराम नगर, मंजुषा लेआउट, हनुमान नगर, कुणबी सोसायटी, किल्ला वार्ड या विविध परिसरांत प्रबोधन कार्य करण्यात आले. भद्रावतीच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक मंडळींनी उत्कृष्ट नियोजन आणि आयोजन करून या वारीला यशस्वी केले.या वारीत विविध वक्त्यांनी महत्त्वपूर्ण सामाजिक मुद्द्यांवर प्रबोधन केले. भाऊसाहेब थुटे, रवी दादा मानव, नरेंद्र दादा जीवतोडे, राज घुमनर, आणि उदयपाल महाराज यांनी आपल्या विचारांनी जनजागृती केली. विशाल दादा गावंडे, प्रकाश पिंपळक, आणि निलेश जी कुत्तरमारे यांनी कार्यक्रमाचे संचालन करून या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.रात्री लोकमान्य विद्यालय येथे भाऊसाहेब थुटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य सप्तखंजिरी कीर्तनाचा कार्यक्रम झाला. नागरिकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आणि प्रबोधनाच्या संदेशाचा आपल्या जीवनात अंगीकार करण्याचा संकल्प केला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या सामाजिक सुधारणा आणि ग्रामराज्य निर्मितीच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी ही वारी भद्रावती तालुक्यातील जनतेला प्रेरणा देणारी ठरली आहे. या वारीमुळे तालुक्यातील समाजात नवचैतन्य संचारले आहे, आणि ग्रामसुधारणेच्या दिशेने ही वारी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.उद्यापासून ग्रामीण भागातील प्रत्येक गावात ही वारी पोहोचणार असून, गावोगावी जनजागृतीसाठी ती नव्या उमेदीने वाटचाल करणार आहे.