भागवत नांदणे सर्कल प्रतिनिधी वरवट बकाल
संग्रामपूर :तालुक्यांतील पातूर्डा येथील स्व:महादेव पांडुरंग आमझरे यांचे दि ०७/१२/२०२३ रोजी अपघाती निधन झाले होते, ते घरातील कर्त पुरुष होते,त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परीवार आहे. त्यांच्या अकाली जाण्यामुळे आर्थीक परिस्थिती खूप हालाखीची झाली आहे, भोई समाज मदत संस्थेचे समन्वयक यांनी पिडीत कुटुंबाचे सत्य परिस्थितीचे निरीक्षण करून आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्या अनुषंगाने दि १ आगस्ट २०२४ रोजी भोई समाज बांधवाना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. व काल दि १८ ऑगस्ट २०२४ रोजी स्व: महादेव अमझरे यांच्या पत्नीकडे मदतीची रक्कम १५००० सोपविण्यात आली त्या प्रसंगी भोई समाज मदत संस्थेचे समन्वयक श्री.उमेश सुरेश राजगुरे,महादेव नामदेव कुरवाडे, विनोद रमेश मेसरे,सुभाष साटोटे,अजय शालीग्राम कुरवाळे,रमेश नांदणे,विजय शहादेव अमझरे, मारोती बोरवार,रविंद्रभाऊ मात्रे, पुर्णाजी कुरवाळे,अंकुश लक्ष्मण कुरवाळे,श्रीकृष्ण मारोती अमझरे,(पत्रकार)भागवत नांदणे आदी समाज बांधव उपस्थित होते.