स्वरूप गिरमकर
ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : शिरूर तालुक्यातील आरणगाव येथील पोलीस पाटील संतोष लेंडे यांना हिट अँड रन प्रकरणी दोषी ठरवत शासनाची प्रतिमा मलीन करत सदर अपघातात प्रथम दर्शनी ते जबाबदार असल्याचे दिसून येत असल्यामुळे उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे / देवकाते यांनी खटल्याची न्याय चोकशी होईपर्यंत निलंबणाची कारवाई केली आहे.संतोष लेंडे हे दि. ३१/०५/२०२४ पिकअप वाहन क्र. एम एच १२ एस एफ ३४३९ मध्ये स्वतः शेजारी बसून त्यांचे वाहन त्यांनी स्वतःची अल्पवयीन मुलीस आरणगाव ते वडगाव बांडे रोडवर चालविण्यास दिले होते.सदर मुलीकडून अपघात होऊन अपघातात अरुण विठ्ठल मेमाणे यांचा मृत्यू झाला होता.शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होऊन ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
त्यांच्या निलंबणासाठी राहुल चौधरी ( पाबळ ), तसेच रवींद्र मखर व समस्थ ग्रामस्थ आरणगाव यांनी अर्जाद्वारे मागणी केली होती.