सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दिनांक ३१ जूलै २०२४ आज रोजी महाराष्ट्र जातीयवादाच्या संकटने होरपळत असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी मात्र आणि विरोधीपक्षनेते मात्र जातीवादाने होरपळत असलेल्या महाराष्ट्रात पोळ्या भाजून घेताना दिसत आहेत. या जातीयवादाला जबाबदार कोण असा सवाल महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला पडला आहे.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात जातीयवादाने रणशिंग फुंकले असून महाराष्ट्रातील शहर आणि ग्रामीण भागात या जातीयवादाचे अनेक बळी गेले आहेत. महिला असो पुरुष लहान थोर तरूण महाराष्ट्रातील युवक जातीयवादाच्या संकटने होरपळत आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते शहरातील शासकिय आणि निमशासकीय तसेच खासगी कार्यालये कंपन्या या क्षेत्रात जातीयवादाने थैमान घातले आहे.या दहा वर्षात महाराष्ट्राला भ्रष्टाचार आणि बेरोजगारीच्या भस्मासुराने होरपळले आहे परंतु आता जातीयवादाच्या भस्मासुराने सुध्दा महाराष्ट्र होरपळताना दिसतो आहे. याला जबाबदार कोण असा सवाल महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला करत आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या जातीयवादी नेत्यांनी आणि पुढाऱ्यांनी सत्तेची पोळी भाजण्यासाठी संत महात्म्यांनी जन्म घेऊन मानवाला समतेचा आणि समतेचा उपदेश दिला तोच महाराष्ट्रात आज जातीयवादाने बरबटला जातोय ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण सुध्दा आज जातीयवादाने होरपळताना दिसते. काल संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात घडली. आई वडिलांच्या नंतर प्रथम गुरू असणाऱ्या शाळेतील एका शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करून त्याचा खुन केल्याची घटना घडली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला कारण काबाड कष्ट करून मुलांना शिक्षण घेण्यासाठी आई वडील मोठ्या आत्मविश्वासाने शाळेत पाठवितात त्याच शाळांमध्ये शिक्षक म्हणून जातीयवादी नराधम वावरत असतील तर विद्यार्थी घडणार कसे असा सवालही महाराष्ट्रातील जनतेला पडतो आहे. या घटनांना महाराष्ट्र राज्य सरकार जबाबदार असल्याचे जनतेतून मत येत आहे. कायदे कडक असताना आरोपींना पोलिस प्रशासनाकडून मोकळीक मिळते. पैशांच्या जोरावर आरोपी मोकाट फिरतात आणि पुन्हा एखादा गुन्हा करायला घाबरत नाहीत. महाराष्ट्रातील बोकाळलेल्या जातीयवादाला राजकीय पक्षांच्या जातीयवादी नेत्यांबरोबरच येथील राज्य शासन जिल्ह्याप्रशासन, स्थानिक प्रशासन मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे मत जनतेतून येत आहे.