पंकज चौधरी तालुका प्रतिनिधी रामटेक
पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर अंतर्गत येणाऱ्या चोरबाहुली वनविभागात कार्यरत असलेल्या वनरक्षक वैशाली लिल्हारे यांना वनविभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.”लोकांचा सहभाग आणि पर्यावरण-विकास उपक्रमांतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प,नागपूर मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दिनांक २९ जुलै २०२४ रोजी जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधुन दिल्ली येथिल इंदिरा पर्यावरण भवनात आयोजित कार्यक्रमात भूपेंद्र यादव (पर्यावरण मंत्री), वन आणि हवामान बदल मंत्रालय,भारत सरकार व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांचे मार्फत वनरक्षक वैशाली लिल्हारे यांना “राष्ट्रीय पुरस्कार”देऊन गौरविण्यात आले.यावेळी वनरक्षक वैशाली लिल्हारे यांनी प्रभुनाथ शुक्ला (क्षेत्र संचालक,पेंच),पुजा लिंबगावकर (सहाय्यक वनसंरक्षक,पेंच),राहुल शिंदे (वनपरिक्षेत्र अधिकारी,चोरबाहुली),सचिन ताकसांडे (क्षेत्र सहाय्यक,चोरबाहुली),सहकारी वनरक्षक, वनपाल, वनमजुर,हंगामी मजूर यांचे आभार मानले.