दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा : येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पटेल कृषि महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातर्फे प्रगत कौशल्य प्रशिक्षण 2024-25 अंतर्गत पाळीव जनावरांतील विविध रोग व त्यांचे व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कृषी महाविद्यालयात अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी दि. 30 जुलै रोजी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांनी केले. कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून विषय तज्ञ डॉ. एम. जे. तळेकर, पशुधन विकास अधिकारी, वैजाली वर्ग-१, ता. शहादा, जि. नंदुरबार यांनी पाळीव जनावरांतील विविध रोगांवर यामध्ये जिवाणु जन्य, विषाणु जन्य, संसर्ग जन्य व प्रोटोझोवल अश्या विविध मुख्य फऱ्या, लाळ्या कुरकत, घटसर्प, गर्भपात आणि पशुमारी रोग या सारख्या अत्यंत गंभीर रोगांवर व त्याचे रोग व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. विशेषतः त्यांनी जनावरांचे लसीकरण करायलाच पाहिजे याबद्दलचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्याबरोबरच इतर विषयावर प्रकाश टाकला यामध्ये जनावरांचे खाद्य व्यवस्थापन, पोषण मुल्य, गुरांचे आंतर कृमी व बाह्यकृमी व्यवस्थापन करणे यावरचे सुध्दा मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन प्रा. राकेश एम. कापगते यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डी.एस. सुर्यवंशी यांनी केले. सदर कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.