महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.30:- महिला आर्थिक विकास महामंडळ, चंद्रपुर समन्वय लोकसंचालित साधना केंद्र,भद्रावती द्वारा आयोजित नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प कार्यक्रम दि.३०-०७-२०२४ रोज़ी श्री मंगल कार्यालय येथे पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ. आशाताई प्रफुल ताजने कार्यक्रमाचे उद्घाटक: मा.श्री.रवींद्र शिंदे ,माजी अध्यक्ष,चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्या.चंद्रपुर तथा संस्थापक स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपुर व प्रमुख मार्गदर्शन: मा.श्री.प्रदीप काठोळे ,जिल्हा समन्वयक अधिकारी ,मविम, चंद्रपुर व मा.प्रा.श्री.धनराज आस्वले अध्यक्ष,स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट,चंद्रपुर व मा.श्री.गजानन देवतळे ,फाउंडरमेम्बर रियांस कंपनी मा.श्री.डॉ.पाटिल,फाउंडर मेम्बर रियांस कंपनी व मा.श्री.सुजीत नंदरे , शेती/वनऔषधि मार्गदर्शन व प्रमुख उपस्थिति मा. श्रीमती. सुषमाताई शिंदे संचालक, स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपुर याच्या उपस्थित पार पडला सदर कार्यक्रमास भद्रावती तालुक्यातील बचत गट व सभासद हजर होते. अनेक बचत गटानी लघुउधोगात भरारी घेतली त्याचा सत्कार सुध्दा महिला आर्थिक विकास महामंडळ, चंद्रपुर समन्वय लोकसंचालित साधना केंद्र,भद्रावती द्वारा करण्यात आला.सदर कार्यक्रम पार पाडण्याकरीता महीलानी अथक परिश्रम घेतले.











