अभिजित यमगर जिल्हा प्रतिनिधी पुणे
विद्यार्थी मध्ये लोकशाही मूल्य रुजावी यातून प्रगल्भ नागरिक तयार व्हावेत यासाठी उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल पोंधवडी येथे सोमवारी दिनांक 29 /7/ 2024 रोजी शालेय प्रतिनिधी निवड निवडणूक अतिशय उत्साहात पार पडली या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे आधार चेकिंग मतदान प्रत्यक्ष खून इ -वोटिंग मशीन प्रत्यक्ष मतदान पेटी या सर्व वस्तू स्वतः हाताळल्या.ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी शाळेतील प्राचार्य बिचकुले मॅडम व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले आणि उपक्रमातून गुणवत्तेकडे या उक्तीनुसार विद्यार्थ्यांवर खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्यांची रुजवणूक केली. या निवडणुकीसाठी विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून सई लाहोर हिची तर विद्यार्थि प्रतिनिधी म्हणून आदित्य दराडे यांची निवड झाली या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून गिरी मॅडम , पाटील मॅडम , डोईफोडे मॅडम , करिष्मा मॅडम ,शेख मॅडम,मुंजेवार मॅडम व कडू मॅडम यांनी काम पाहिले.











