विलास गोराडे तालुका प्रतिनिधी सिल्लोड
सिल्लोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते मा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील जन सामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्याची प्रदेशाध्यक्ष मा. श्री जयंत पाटील साहेब यांच्या सहमतीने व संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री. पांडुरंग पाटील तांगडे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात तसेच प्रदेश उपाध्यक्ष शेख शफिक , प्राचार्य श्री. सुनील वाकेकर सर, यांच्या मार्गदर्शना खाली चळवळीत नेतृत्व प्राध्यापक श्री. राहुल कुमार ताठे यांची सिल्लोड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, ते माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्थापनेपासून एकनिष्ठ श्री. मारुतीराव पाटील ताठे यांचे चिरंजीव आहेत त्यांनी माझ्या या प्रवासात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली पाठिंबा दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहेत असे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राहुल कुमार ताठे म्हणले


