गजानन जिदेवार आष्टीकर तालुका प्रतिनिधी हदगाव
हदगाव : लग्न होऊन आठ दिवस झाले नाही तरी अंगाची हाळद आणखी निघाली नाही तर नवनिर्वाचित नवरदेवाचा अपघाती मृत्यू सोमवारी दुपारी घोगरी तालुका हादगाव येथील नवनिर्वाचित नवरदेव सुरज उर्फ एकनाथ कदम. यांचा शिवपुरी शिवारात मोटरसायकलचा अपघात घडून झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की घोगरी येथील नवनिर्वाचित नवरदेव नामे सुरज उर्फ एकनाथ सुदाम कदम वय 22 यांचे लग्न मागील रविवारी चिकाळा तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड . येथील वधू सोबत धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे पार पडला होता. लग्नाला आठ दिवस झाले आहेत परंतु आठ दिवसाच्या काळात नवनिर्वाचित वधू वर आले चंद्रपूर ,बारड, आणि विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन दर्शन घेतले नवरदेव हा सोमवारी एकटा मोटरसायकल वरून तामसा येथून घोगरी कडे जात असताना अचानकपणे गाडीचा अपघात दुपारी झाले असल्याचे सांगण्यात आले विशेष म्हणजे तो कोणत्याच वाहानाला धडकला नसल्याचे चर्चेतून ऐकवास मिळाले अपघात झाला त्या ठिकाणी तो मरण पावला असल्याची चर्चा होती. तरुण हा व त्यांचे कुटुंब धार्मिकतेला महत्व देत असतात सर्व देवांना त्यांनी भेटी देऊन आले असता काळाने त्याच्यावर झडप घातली म्हणजे किती दुर्दैवच म्हणावे लागेल. अशा वेळी एखादा देव त्याच्या मदतीला का धावला नाही. अशी सुजान जनतेतून ऐकवास मिळत होते. अत्यंत संयमी व शांतताप्रिय असलेले कुटुंब मूळचे घोंगरी ता. हादगाव येथील रहिवासी होत. परंतु दरवर्षी सर्वच कुटुंब हैद्राबाद येथे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ,व उदरनिर्वाह करण्यासाठी कामाला जात असतात. उत्तम कारागीर म्हणून त्यांची ओळख आहे. नवनिर्वाचित नवरदेव सूरज उर्फ एकनाथ कदम यांचे सेवविच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा येथे वायफना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोलेकर व आष्टी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कदम यांनी करून चार वाजता शेव कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले रात्रीला उशिरा घोगरी तालुका हादगाव येथे नवनिर्वाचित नवरदेवावर अंत्यसंस्कार करण्यात आले .घडलेल्या घटनेत गावात शोकाकुल वातावरण असून, सर्वत्र या घटनेची हाळहाळ व्यक्त करीत आहेत. घटनास्थळी तामसा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कमल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी नरवटे , पोलीस जमादार श्याम नागरगोजे, व शिपाई पवार साहेब, यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कारवाई केली असल्याचे समजते.