गजानन जिदेवार आष्टीकर तालुका प्रतिनिधी हदगाव
हादगाव : – तालुक्यातील मौजे तामसा .ता. हादगाव येथे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात, आज मुख्याध्यापक तथा प्राचार्य राजेश चौहान. यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करण्यात आले. देशात यावर्षी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग झाले .असून राज्यातील महामार्गाच्या बाजूला असलेल्या शेकडो वर्षांच्या उभे असलेली झाडे तोडण्यात आली .त्यामुळे जमिनीचे तापमान वाढले आहे. आणि निसर्ग कोपला आहे .पाऊस कधीतरी पडत असून, शेतकऱ्यांचे पीके ही पावसाअभावी व नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य शासनाने झाडे लावा देश वाचवा. असा संदेश दिला. त्या संदेशेची अंमलबजावणी म्हणून गेल्या दोन दिवसापासून माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तामसा येथे विविध जातीचे झाडे शो ची झाडे, फळांची झाडे, लावण्यात येत असून हजार झाडे लावून ते जगवण्याचा संकल्प शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य राजू चव्हाण, यांनी केला आज पाथरड ग्रामपंचायत सदस्य तथा उद्योजक व त्यांचे सहकारी चंदू यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात झाडे लावण्यात आली ,तसेच ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गौतम कदम ,यांच्याही असते आज वृक्षारोपण करण्यात आले काल उद्योजक संजय पवार, यांच्या हस्ते ही मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी शाळेचे कर्मचारी वर्ग, प्राध्यापक अशोक कडबे, लक्ष्मण शेळके ,राजेंद्र कदम ,शिक्षक स्टाफ ,व चतुर्थश्रेणी कर्मचारी, उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बोलताना म्हणाले की शाळेच्या चारी बाजूने वृक्षारोपण करून कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व वृक्षप्रेमी जनतेच्या सहकार्याने ठिबक सिंचन करून ,सर्व सर्व वृक्ष जोपासण्याचे प्रयत्न करून झाडे जगवील असा आत्मविश्वास व्यक्त केला .लवकरच जनतेच्या सहकार्यातून किंवा पालकांच्या सहकार्यातून सिमेंटच्या दहा खुर्च्या सावलीच्या ठिकाणी लावून घेऊ येणाऱ्या जाणाऱ्या पालकांना व शिक्षकांना तेथे थोडा विसावा घ्यावा वाटला तर निश्चित घेतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली .प्रत्येक पालकांनी, तसेच शिक्षकांनी ,व समाजसेवकांनी ,तसेच वृक्षप्रेमी जनतेने, जमेल तिथे झाडे लावून वृक्षारोपण करून जोपासावे असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.