तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर :मुंबईच्या वरळी भागात झालेल्या हिट अॅड रन अपघातात महिलेचा मृत्यू दि. ७| ७|२०२४ रोजी रविवारी सकाळी ५. ००वाजेच्या सुमारास झाला होता. मुंबई वरळी येथे सकाळी एका दुचाकीला व कारची धड बसून महिलेचा मृत्यू झाला होता पति थोडक्यात बचावला. परंतू अपघातानंतर या कारमधील चालकांनी पळ काढला होता. प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. ज्या कारने अपघात झाला ती कार शिंदे गटाचे पालघर मधील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा कार चालवत होता. त्याचा ड्रायव्हर ही यावेळी कार मध्ये बसला होता. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. सविस्तर माहिती अशी की मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अ ‘ट्रिया माॅलजवळ हिट अॅड रन ही घटना घडली आहे . अ ‘ट्रिया माॅलजवळ असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या नाखवा , नाखवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डाॅकला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. मासेघेऊन दुचाकीवरून परतत असताना त्या दांपत्याच्या दुचाकीला कार चालकाने पाठीमागून गाडीने धडक दिली.सामाण खूप व मासे होते त्यामुळे दुचाकी स्वाराचे नियंत्रण सुटले आणि दोघेही चारचाकी कारच्या बोनेटवर पडले नवर्याने प्रसंगावधान राखून बोनेटवरून बाजूला उडी मारली मात्र, महिलेला स्वत:ला बाजूला होता आले नाही. अचानक झालेल्या या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरून चालकाने गाडी पळवली त्यात त्या बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेले. त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तत्काल मुंबई, सेंट्रल येथील नायर रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता . डाॅक्टरांनी तपासा अंती महिलेला मृत घोषित केले.