अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
ग्रामपंचायत बिटरगाव बु येथील ग्राम रोजगार सेवक म्हणून नेमणूक असलेल्या गजानन बद्रीसिंग रत्ने वय ५१ वर्ष यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची रक्कम स्वीकारताना आज दिनांक 8 रोजी रंगेहात पकडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणातील तक्रारदार यांनी दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे गजानन बद्रीसिंग रत्ने वय ५१ वर्ष पद ग्राम रोजगार सेवक नेमणुक ग्रामपंचायत बिटरगांव बु. ता. उमरखेड यांनी लाचेची मागणी केल्याची लेखी तकार दिली.सदर लेखी तकारी वरून दिनांक ०८/०७/२०२४ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील इलोसे गजानन बद्रीसिंग रत्ने यांनी स्वतः करीता तक्रारदार यांच्या वडीलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार योजना अंतर्गत ग्राम मन्याळी ता.उमरखेड येथे गुरांचा गोठा मिळण्याकरीता केलेला अर्ज मंजुर करण्याकरीता ७,०००/- रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून दिनांक ०८/०७/२०२४ रोजी आयोजीत केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान गजानन बद्रीसिंग रत्ने यांनी हनुमान मंदीर प्रवासी थांबा च्या समोर रस्त्यावर स्वतः करीता तडजोडीअंती ५,०००/- रूपये लाचरक्कम तकारदार यांचे कडुन पंचासमक्ष स्विकारली असता रंगेहात पकडण्यात आले. सदरची कार्यवाही मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, अनिल पवार, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे आणि पोलीस अंमलदार जयंत ब्राम्हणकर, अब्दुल वसिम, सचिन भोयर, सतिश सोनोने, सुरज मेश्राम, भागवत पाटील व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे अँटी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केली.