सिध्दोधन घाटे जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दिनांक ०८ जूलै २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे कन्हेरवाडी गावचे माजी सरपंच रासपचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेभाऊ फड यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परळी वैजनाथ मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती देत विधानसभा लढवणारच असे ठरवले असून या या घोषणेने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून परळी वैजनाथ शहरासह जिल्ह्याभरातील जनतेचे लक्ष राजेभाऊ फड यांच्या घोषण वेधले आहे. बीड जिल्ह्यात वाढत चाललेला भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्थेचा वाजलेला बोजवारा जिल्ह्यात वाढत चालललेले खुन, दरोडो, सामान्य जनतेवर गुंडाबरोबरच पोलिस प्रशासनाकडून होत असलेले अन्याय अत्याचार तसेच जिल्ह्यातील पोलिस दलाकडून सामान्य जनतेला देण्यात येत असलेली वागणूक या सर्व गोष्टींचा विचार केला तर बीड जिल्ह्यात जनता राज नसून गुंडाराज वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील गलिच्छ राजकारणामुळे भ्रष्ट राजकारणी नेत्यांच्या आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या काही वर्षांत बीड जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली असून सामान्य जनतेला बीड जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळवून देणारा प्रमाणीकपणे प्रतिनिधीत्व करणारा उमेदवार राजे भाऊ फड यांच्या माध्यमातून मिळत आहे. दरम्यान काल झालेल्या पत्रकार परिषदेत राजेभाऊ फड यांनी विधानसभा निवडणुक लढवणार ठाम निर्णय घेतला असून परळी मतदार संघच नव्हेच तर संपूर्ण बीड जिल्हा भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करून जिल्ह्यातील ढगमगलेली कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा सुरळीत करून जिल्ह्यातील सामान्य जनतेला न्याय देऊ असे मतही त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केले. राजेभाऊ फड यांनी गुत्तेदारीच्या माध्यमातून आज रोजी तालुक्यातील अनेक तरूणांना रोजी रोजगार उपलब्ध करून दिला असून त्यांच्या माध्यमातून परळी वैजनाथ शहरासह तालुक्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. राजेभाऊ फड हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व असून ते प्रगतशील उद्योजक म्हणून त्यांना महाराष्ट्रातील अनेक लोक ओळखतात तसेच नागरीकांच्या अडचणीत धाव घेऊन नागरीकांना निस्वार्थीपणे मदत करणे हा त्यांचा स्वभाव असून कन्हेरवाडी गावातील प्रत्येक मुलींच्या विवाहासाठी ११००० रूपये रोख रक्कम देतात हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या त्यांनी चालू ठेवला आहे .अशा निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या व्यक्तीला परळी विधानसभा मतदारसंघ निश्चितच निवडून देणार असे मत काल झालेल्या पत्रकार परिषदे नंतर परळी वैजनाथ मतदार संघातून येत आहे.











