मधुकर बर्फे तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण गोदावरी नदी पात्रातून गेली अनेक दिवसांपासून अवैध रित्या वाळू उपसा व चोरटी वाहतूक केली जात आहे. तालुक्यातील पाटेगाव, दक्षिण जायकवाडी, पंथेवाडी, आपेगाव,नवगाव, वडुळी वागडी, येथील गावालगत गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा केला जात आहे.शासनातर्फे वाळू लिलाव बंद आहे महसुल विभाग कडून अद्याप लिलाव संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही अशे असले तरी वाळू माफिया दिवस रात्र कुणाच्या आशिर्वादाने बिनधास्त पणे वाळू उपसा व वहातूक करत आहे. अवैध रित्या चालू असलेल्या वाळू धंद्याकडे स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व महसुल विभाग जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का.असा प्रश्न पैठण गोदावरी नदी काठावरील गावकऱ्यांनी केला आहे.रात्रंदिवस दिवस ट्रक. ट्रॅक्टर. हायवा.टिपर वाहनाच्या च्या साह्याने अवैध रित्या नदीपात्रातून उपसा केलेली वाळू छत्रपती संभाजी नगर.वाळूज पंढरपूर. शेंद्रा बिडकीन अशाप्रकारे अनेक ठिकाणी शहरी व ग्रामीण भागात वाळू सप्लाय केली जात आहेअशे असले तरी महसूल पथकाकडून रोडवर अवैध वाहतूक दरम्यान कार्यवाही होताना दिसत नाही कायमस्वरूपी आळा बसेल अशी कारवाई नाही. वाळू माफिया चे लागेबांधे असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. गोदावरी पात्रातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील वाळू उपशामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासकीय यंत्रणेवर तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू चोरीमुळे माफियाचे फावले जात आहे. कुणाच्या आशिर्वादाने हा दुर्लक्षित खेळ चालू आहे. शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल भुखंड खुले आम चोरी होत असून शासनाने गांभिर्याने दखल घेऊन त्वरीत वाळू चोरट्या विरूध्द पाउस उचलून नदीपात्रात व रोडवर वहातूक दरम्यान कारवाई करावी असे मत पैठणकर व्यक्त करत आहे.











