मारोती सुर्यवंशी शहर प्रतिनिधी नरसी
नरसी: नरसी शहर व परिसरात मटका, गुटखा, जुगार ,अवैध दारू विक्री आँनलाईन लाटरी जोमात सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना, महिलांना , आईवडिलांना या सगळ्या गोष्टींचा फार त्रास होऊ लागला आहे हे धंदे बंद करून नरसी शहर व परिसरात शांतता निर्माण व्हावी यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे परंतु आपल्या हद्दीतील अनधिकृत या सर्व अवैध धंदे वाल्या लोकांकडे रामतीर्थ पोलीसांचे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने”अर्थपूर्ण” दुर्लक्ष” करून या उलट अवैध व्यवसाय करणाऱ्यांना वाव( पाठबळ) दिले जात आहे, हे धंदे करणारे लोक सोबत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पगारावर ठेवून आणखी त्वेषाने म्हणतात की “आशा बातम्या पेपरला रोज येतात आमचं कोण्ही काही वाकडं करू शकत नाही” “कारण आम्ही वरपर्यंत पैसा पेरतो” ! त्यामुळे अक्षरशः तरूण मंडळी बिनदिक्कत पणे फार मोठया प्रमाणात ह्या गोष्टीकडे वळते आणि प्रसंगी गुन्हेगारी वाढत आहे, चोरी,पाकीटमारी, मोबाईल चोरी, महिलांचे दागिने चोरीला जाणे असे प्रकार दररोज घडत आहेत असे असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, तरूणांच्या दारू पिऊन धिंगाणा घालणे, गरीब लोकांना दाब देऊन मारहाण करणं असे एक ना अनेक ठिकाणी हे प्रकार दररोज घडत आहेत यावरून पोलीस प्रशासनाच्या व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यक्षमतेवर शंका व्यक्त केली जात आहे.सदरील अवैध गुटखा व्यवसायावर कायद्याने बंदी आहे तरी सुद्धा प्रत्येक पानटपरी, छोट्या छोट्या किराणा दुकानात गुटखाबंदी लागू असुन “गुटखा” विक्री होते,”मटका” सुध्दा नरसी शहरात एकाच ठिकाणी न खेळता “भ्रमणध्वनी” द्वारे (मोबाईल), आकडा घेऊन आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपले “पंटर” नेमुन हा अवैध धंदा परीसरातील गावागावात सुरू आहे.जुगाराबद्दल तर कधी शेतात तर कधी उघड माळरानावर “झन्ना मन्ना” , “तिर्रट” नावाचा जुगार लाखो रुपये लावून खेळला व खेळविण्यात येत आहे “आँनलाईन लाटरी” खेळणे यासाठी पैसा रोज लागतो आणि तो पैसा आयता मिळवण्यासाठी व लवकर श्रीमंत होण्यासाठी तरुण पिढी बरबाद होत आहे परीणामी घरातील सर्व मौल्यवान वस्तू, धान्याची चोरी करून हेच पैसे जुगार खेळणे, मटका खेळणे आँनलाईन लाटरी यासाठी खर्च करतात यामध्ये यश मिळाले तरी आनंदाने दारू पिणे आणि हरला तर दुःखी होत दारू पिऊन धिंगाणा घालत आहेत. यामुळे अनेकांना आपले उभे आयुष्य उध्वस्त होऊन गुन्हेगारी वृत्ती कडे जाताना दिसत आहे.रात्री उशिरा पर्यंत हे धंदे सुरू राहतात त्यामुळे नरसी शहर व परिसरात अनेक ठिकाणी चोरी चे प्रकार घडले आहे. त्यात दारू च्या नशेत कुणाकडून काय गुन्हा घडेल याचा अंदाज बांधता येत नाही.आनेक घरी दररोज भांडण आईवडिलांना मारहाण ज्याचं लग्न झालेल्या व्यक्तीचे आपल्या पत्नीला, मुलाबाळांना मारहाण करून घराबाहेर काढले जाते याचे विदारक मनाला सुन्न करणारे चित्र पहावयास मिळते आहे. या सर्व अवैध व्यवसायांमुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी, व्यसनाधीनतेकडे वळत बरेच तरुण मरणाला कवटाळले व म्हातारी आई वडिलांना मरणयातना देत आपलीं पत्नी मुलबाळ सोडून गेले ह्या सर्व गोष्टी ला पोलीस प्रशासन ,त्याच बरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, जबाबदार आहे अशी चर्चा नरसी शहर व परिसरात होत आहे.तेव्हा संबंधित अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून त्वरित बंद करा अशी मागणी होत आहे.