देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जवळपास कोटी रुपये खर्च झाले असून त्या अंतर्गत बऱ्याच ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेल्या आहे तसेच या योजनेअंतर्गत नवीन पाण्याची टाकी ही उभारण्यात आलेली आहे,मात्र जल शुद्धीकरणाचा प्रकल्प त्यासाठी टेक्निकल उभारणी झाली नसल्यामुळे हा प्रकल्प रखडलेला असून त्यामुळे वेळीच गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नाही.संबंधित गुत्तेदार यांनी या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित पाणीपुरवठ्याच्या विहिरीवर नवीन मोटार तसेच विद्युतीकरण विजेचे कनेक्शन केलेले नाही.नवीन बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे जवळपास जलशुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत राहिलेले बाकीची कामे केले नसल्यामुळे हा प्रकल्प जवळपास चार ते पाच महिन्यापासून रखडलेला आहे.या रखडलेल्या प्रकल्पामुळे गावात उलट सुलट चर्चा असून पावसाळ्यात तरी गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळेल अशी अपेक्षा होती,मात्र गावकऱ्यांचा अपेक्षा भंग झालेला आहे.या प्रकल्पाकडे सरपंच व ग्रामसेवक यांचेही दुर्लक्ष आहे हा प्रकल्प वेळीच पूर्ण करून गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी होत आहे.