जलील शेख तालुका प्रतिनिधी पाथरी
राष्ट्रवादी परभणी जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पक्षातील पाथरी शहराचे माजी शहराध्यक्ष खालेद शेख यांनी आज शिवसेना प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुजीब आलम तर आभार शिवसेना शहर अध्यक्ष युसुफुद्दीन अंसारी यांनी मानले.राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष खालेद शेख यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या मध्ये मंगेश सुखदेवे,शंकर शेजुळ, गोविंद आवटे,मुन्ना राज,नदीम खान,कलीम शेख,अकबर खान,बबन मास्टर,नारायण मोरे,सुरेश कसबे,बुऱ्हाण राज, भागवत कांबळे,सतीश घाडगे,रफिक शेख,शेख मुनीर,शेख चांद,सोहेल आत्तार,अलीम अन्सारी,उत्तम भदर्गे इत्यादी सह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला शहरामध्ये बळ प्राप्त होत आहे.