प्रशांत सूर्यवंशी शहर प्रतिनिधी तळोदा
तळोदा- तळोद्यात चिनोदा रस्त्यावरील शिक्षणमहर्षी कै. गो.हू.महाजन चौकात रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा तयार झाला असून प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.तळोद्यातील बस स्टँड पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिनोदा रोडवरील कै.गो.हू.महाजन चौकातच रस्त्याचा मधोमध मोठा खड्डा तयार झाला असून त्यात पावसाचे पाणी साचून खड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनधारकांचा जीवाला धोका ठरत आहे.रोजच अनेक मोटरसायकल चालकांची खडड्यात गाडी गेल्याने घसरून पडत आहे.त्यामुळे प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसून येत आहे.मागील आठ दिवसापासून तळोद्यात पावसाची रिपरिप सुरू आहे.रस्त्यावर सतत पाणी साठत असल्यामुळे व अवजड वाहने व बस रस्त्यावरून जात असल्यामुळे हा खड्डा तयार झाला.तसेच सुरवातीला लहान असलेला खड्डा आता मोठा झाला आहे.पण प्रशासनाचे अजूनही या खड्ड्याकडे लक्ष गेलेले नाही.याच रस्त्याला लागून स्टेट बँक व शहरातील नामांकित व मोठी शाळा असून हजारो विद्यार्थी सायकलीने शाळेत येजा करत असतात.आर्थिक व्यवहारासाठी शेकडो लोक बँकेत जात असतात.त्यामुळे वाहनधारकांना व विद्यार्थ्याना खड्ड्याच्या अंदाज येत नसल्याने खड्यातच सायकल व गाडी अटकून पडत आहे.त्यामुळे भविष्यात होणारा गंभीर अपघात टाळायचा असेल तर प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात का होईना खड्यात मुरूम खडी टाकून भराव करण्यात यावा अशी मागणी वाहनधारकांमध्ये जोर धरू लागली आहे.मागील आठ दिवसापासून माझ्या दुकानासमोर असलेला खड्डा मोठा होत चालला आहे.थोडासाही पाऊस पडला की पाण्याने झाकला जातो.त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्याचा खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक मोटारसायकल चालक व सायकलीवरून शाळेत येजा करणारे विद्यार्थी खड्ड्यात येऊन अडकत आहे. तसेच खड्ड्यात पाणी साचत असल्यामुळे मोठे वाहन गेले की घाण पाण्याचे शिंतोडे उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर उडतात.त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात का होईना खड्डा भरुन मार्ग काढावा असे मत स्थानिक दुकानदार व्यक्त करत आहे.