सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
ओतूर (दि .८) एसटी आणि ब्रिझा कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच मृत्यूमुखी तर १५जण जखमी झालेची घटना रविवारी सकाळी कल्याण- अहमदनगर महामार्गावर ओतूर महाविद्यालयाजवळ घडली.या भीषण अपघातात मृत झालेल्या तरुणांची महेश तानाजी गायकवाड(वय २३ वर्ष,रा.मोहोळ,ता.मोहोळ, जि.सोलापूर),प्रतीक अशोक शिर्के(वय २२ वर्ष,रा.नारळा, ता.पैठण,जि.संभाजीनगर)अशी नावे आहेत.अपघातातील १५ जखमींना आळेफाटा,नारायणगाव येथे उपचार करून घरी पाठवण्यात आल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत.पारनेर एसटी आगराची पारनेर-मुंबई ही एसटी(क्र.एम. एच.१४,बी.टी.४२८०) नगर-कल्याण महामार्गा वरून मुबंईला जात असताना,ओतुरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणारी ब्रीझा कार(क्र.एम.एच.४६,सी.एम.२१५५) ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ब्रिझा कार चालकासह एकजण जागीच ठार झाले तर पारनेर मुबंई एसटीमधील पंधरा प्रवासी जखमी झाले.परिसरा तील ग्रामस्थांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी हलविले.या एसटी बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे.ब्रिझाकार आणि एसटी अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की ब्रिझाकार जाग्यावरच चक्काचूर झाली तर एसटी रस्त्या सोडून खाली खड्ड्यातील झाडीत गेली.अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे,पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,पोलीस हवलदार शामसुंदर जायभाय,मनोज कोकणी,विलास कोंधवळे हे पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.











