भगवान कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड
खंबाळा – कीनवट तालुक्यात येत असलेल्या धरण स्थळ खंबाळा येथे निम्न पैनगंगा प्रकल्प म्हणजे चिमटा धरण या धरणाला सुरुवाती पासूनच शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे विदर्भ व मराठवाड्यातील ९५ नांगर फिरु पाहणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्प म्हणजे चिमटा धरण रद्द करण्याच्या अनुषंगाने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची धरण विरोधी संघर्ष समिती करुन ही धरण विरोधी संघर्ष समिती गेल्या २७ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी पोट तीडकीने पर्यायी योजना सरकार पुढे मांडत असुन सरकारने जर छोटी छोटी कोल्हापूरी बंधारे बांधले तर पाण्याची पातळी नदी पात्रातील थडी बरोबर पाणी साचेल व भोवताली जवळपास दोन कीलोमीटर पर्यंत या पाण्याची पातळी आतुन पोचेल आणि दोन्ही विभाग विदर्भ व मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल आणि ह्या मुळे ९५ गावाला विस्थापित करण्याचा प्रश्नच येत नाही असे केल्यास विशेष म्हणजे ९५ भावासोबत इतर गावे सुध्दा सुखी होतील ही बाब सरकारच्या समोर धरण विरोधी संघर्ष समिती मार्मिकपणे पोटतिडकीने माडंत असुन सरकारने कोल्हापुरी बंधारे बांधून विदर्भ व मराठवाडा सुजलाम सुफलाम करावा व चिमटा धरण निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करावा असा ऋधयाला स्पर्श करणारा टाहो बुडीत क्षेत्रातील शेतकरी व्यक्त करत आहे.








