जलील शेख:तालुका प्रतिनिधी, पाथरी
विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या नेतृत्वांमध्ये तालुक्यातील बालासाहेब घाडगे व आकाश कदम यांचा आज राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश झाला.यावेळी उपस्थित परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक दत्ताभाऊ मायंदळे,संतोष भैया देशमुख,अनंत वाकणकर,ताजू बाबा फारुकी,मुस्ताक भाई,सरपंच विष्णुपंत घाडगे,विठ्ठल घाडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे पाथरी तालुक्यातील अनेक युवकांचा बाबाजानी दुर्रानी यांच्या नेतृत्वावर विश्वास असून राष्ट्रवादी अजितदादा गट याकडे कल असल्याचे दिसते.