नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर. शहराची नांदेड जिल्ह्यात तीर्थक्षेत्र परमेश्वर नगरी म्हणून ओळख आहे. याच परमेश्वर नगरीला साधू संतांची भूमी म्हणून देखील ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या देव भूमीत बरेच बाहेर गावचे नागरिक येतात. परंतु हिमायतनगर पळसपुर डोलारी विदर्भ मराठवाड्याला जोडणार्या रोडची अतिशय दयनीय हाल असून. डब क्यात रोड आहे की रोड मध्ये डबके आहे. हेच समजत नाही. मेन रोडवर देखील पादत्रांना चालणे अवघड तर झाले परंतु दोन हजार आठरा पासून या रस्त्याच्या कामाचि सुरवात झाली परंतु आज पर्यंत हा रस्ता पुर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना यश आले नाही त्यातच हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोक प्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी गुत्तेदार आणि कर्मचाऱ्यां बैठक घेऊन धारेवर धरले परंतु या रस्त्याच्या कामाला गती मिळाली नसल्याने येथील नागरिकांत संतापाची लाट उसळली असल्याचे दिसून येते आहे.