शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : बोर्डीकर कृषी महाविद्यालय सेलू येथील सातव्या सत्रातील कृषी दुतांमार्फत कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषी संस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषीदिनाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. या शिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते ‘पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा’ होते, असे यावेळी कृषीदूतांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले तसेच रॅली काढण्यात आली, कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.अंधारे एस. एस.,आवटे वि.पी.,बडूरे आर. आर,भालेराव के एम,यानी केले. व विशेष मार्गदर्शन प्राचार्य डॉ. ए. ए. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक डॉ. एन.एन. चव्हाण,कार्यक्रमाधिकारी प्रा ए. पी. देशमुख यांनी केले .यावेळी गावचे सरपंच मुख्याध्यापक व इतर शेतकरी वर्ग यांची उपस्थिती लाभली.