देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद सर्कल मधील मोजे गोषेगावात जाऊन या भागाचे मा जिल्हा परिषद सदस्य गणेश बापू फुके यांनी गावातील महिला व नागरिकांना शासनाने आत्ताच जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेतील अनुदानाबाबत व मोफत तीन गॅस सिलेंडर तसेच शेतकऱ्यांसाठी कापूस व सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान,शेतकऱ्यांचे सर्व विज बिल माफ करून मोफत कृषी वीज देण्याचे घोषित करून सरकार तर्फे सर्वसामान्य व सर्वांसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहे.याची घोषणा वित्त मंत्री यांनी विधानसभेत वाढीव अर्थसंकल्पात सर्वांच्यासाठी केल्यामुळे,गणेश बापू यांनी विविध योजना व आर्थिक लाभ याबद्दल गावकऱ्यांशी चर्चा करून नागरिकांची संवाद साधून माहिती दिली.याबद्दल महिला व गावकऱ्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)