प्रधानमंत्री पिक विमा व शासन सबसिडी वाली कर्ज योजनेवर उपाध्यक्ष ढेपे यांचे मार्गदर्शन
मनोज गवई तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सोमवार 1 जुलै स्थानिक आनंद सभागृह मध्ये शहरातील व तालुक्यातील शेतकरी यांचे करिता प्रधानमंत्री पिक विमा योजना व शासन सबसिडी वाले कर्ज योजना संमेलन मध्ये बँकउपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी वेळेवर कर्ज देते ह्या कर्ज देण्याच्या कामांमध्ये कुठलाही पक्षपात न ठेवता शेतकऱ्यांना कर्ज वाटप करते. आणि पक्षपात अध्यक्ष बच्चू कडू आणि कुठलाही बँक संचालक भेदभाव करणार नाही हे बँकच शेतकऱ्यांची आहे चांगल्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी व ग्राहकांनीघ्यावा. जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा वाढवून देत आहे कारण की कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना व ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा दिली पाहिजे अशी अपेक्षा आहे. यावेळी पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे, किशोर कडू, अशोक देशमुख, तालुका राष्ट्रवादी पवार गट अध्यक्ष विनोद काळमेघ, शिवसेना माजी अध्यक्ष बंडू यादव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश पांडे, जिल्हा युवा सेना स्वराज ठाकरे, दुय्यम निबंधक कार्यालय काही दे व जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाले मंचावर उपस्थित होते.