संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे पाहिले जाते. संपूर्ण देशपातळीवर कृषी क्षेत्रात केलेल्या अत्यंत भरीव कार्यामुळे त्यांचे नाव कृषीक्षेत्राशी कायमचे जोडले गेले आहे. १ जुलै ही त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जावी या उद्देशाने आज घाटंजी येथील पंचायत समिती वसंतराव नाईक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर.डी.रायबोले (पशुसंवर्धन विकास अधिकारी) हे होते प्रमुख पाहुणे एस.एम.होटे (नायब तहसीलदार) प्रमुख मान्यवर सुरेश राठोड लक्ष्मण लखमोड (तालुका कृषी अधिकारी) एम.के. चौधरी (सहाय्यक प्रशासन अधिकारी) अरुण खांडरे राहुल खरतडे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण लखमोड यांनी केले शासनाच्या कृषी विभागाच्या योजना फळबाग लागवड योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना माहिती दिली व कृषी दिनाचे महत्त्व समजवून सांगितले शेतकऱ्यांचे मनोबल उचांवण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी जगाचा पोशिंदा भुमी पुत्र शेतकरी महिला पुरुष शेतकरी यांच्या शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व त्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या आवारात विविध प्रजातीचे वृक्ष लागवड करण्यात आले. याविषयी उमेद अभियाना तील कृषी सखी, विकासगंगा संस्था, धान फौंडेशन संस्था व कृषी विभागातील कर्मचारी व अधिकारी कृषी सहाय्यक शेतकरी पंचायत समितीच्या सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण लखमोड पंचायत समिती घाटंजी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी कृषी आदेश देशमुख व वरोडकर मॅडम यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे संचालन घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष बाविस्कर यांनी केले