संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की पुढे पावसाळ्याचे दिवस असून डेंगू मलेरिया सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही डेंगू हा आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो डेंगू आजार टाळण्याकरिता नागरिकांनी खालील बाबींचे पालन करावे. डेंगू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसापेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्याच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजने इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.पाणीसाठा यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकूनठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत.घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कुठेही पाणी साचू देऊ नये.भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान, नारळाच्या करवंट्या कुंड्या टाकाऊ वस्तु इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंगूच्या डासांची पैदास होते तेव्हा अश्या वस्तू घराभोवती ठेवू नका.डासांपासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा व झोपताना मच्छरदाण्या चा वापर करा,नालीमधील पाणी वाहते करा, गटारे, खड्डे, नष्ट करा, संडासच्या पाईपला जाळे बांधा,घरातील कुलर चा वापर करून झाल्यास त्यातले पाणी काढून टाकून त्या ट्रेला पालते घालूनठेवावे तसेच फ्रीज च्या पाठीमागील ट्रे देखील वेळोवेळी कोरडी करावीत.कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीतच टाकावा,लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणी नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंगूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.असे आव्हान करण्यात येत आहे.