विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजने अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार असल्याने महिलांची या योजनेसाठी आवश्यक असणारे दाखले मिळविण्यासाठी महा- ई सेवा केंद्र, ग्रामपंचायत, तलाठी आदी कार्यालयांमध्ये गर्दी दिसत आहे. भिगवण तालुका इंदापूर येथील तलाठी कार्यालयात महिलांची गर्दी पाहता सोमवार दिनांक( ता.१) रोजी पहिल्या दिवशी जवळपास 200 उत्पन्नाच्या दाखल्याचे वितरण झाल्याची माहिती गावकामगार तलाठी देवरे यांनी दिली. त्याचबरोबर महिलांची गर्दी पाहता चार अतिरिक्त कामगार यावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.या योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे परंतु हि योजना याच जुलै महिन्यामध्ये चालू होणार असल्याने या योजनेसाठी लागणारे उत्पन्न दाखला,आधारकार्ड,जन्माचा दाखला, डोमासाईल दाखला आदी दाखल्यांची गरज असल्याने कागदपत्रे गोळा करण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये गर्दी केली जात आहे. महा- ई सेवा केंद्रामध्ये अर्ज भरण्यासाठी दाखले काढण्यासाठी विचारणा केली जात आहे. तर काही महिलांकडून या योजनेची मुदत वाढवण्याची मागणी होत आहे.