(शहराध्यक्ष भीम टायगर सेना)(जिल्हा शल्य चिकित्सक यांना लेखी तक्रार दाखल)
निशांत मनवर तालुका प्रतिनिधी, उमरखेड.
उमरखेड (दि. 21जून) शहरातील खाजगी डॉक्टर यांच्या दरवाढीमुळे गरीब रुग्नांची आर्थीक पिळवणूक थांबवून खाजगी डॉक्टरांवर कठोर कार्यवाही करुन यांचा परवाणे रद्द करण्यात यावा, कारण उमरखेड शहर हे तालुक्याचे ठिकाण असुन अनेक खाजगी दवाखाने उघडले आहेत.काही दिवसांपूर्वीच उमरखेड डॉक्टर असोसीएशन यांनी रुग्नांना लुटण्यासाठी एक नविन दरपत्रक जाहीर केले आहे, याची रुग्नांना कोणतीही माहीती जाहीर केली नाही.या खाजगी डॉक्टरांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे मनमानी कारभार सुरु केला आहे. तसेच दिलेल्या औषधी ही शहरातील कोणत्याही मेडीकलवर उपलब्ध असायला पाहीजे अशा अनेक अडचणींना गरीब रुग्नांना तोंड द्यावे लागते. म्हणून जिल्हा शल्य चिकिस्तक साहेब यांनी पुढाकार घेवून संबंधीत खाजगी रुग्नालयांच्या डॉक्टरांवर कठोर कार्यवाही करुन जानुन बुजुन वाढविलेली दरवाढ ही त्वरीत कमी करुन रुग्नांना दिलासा द्यावा व तसेच खाजगी डॉक्टर यांचे परवाणे रद्द करण्यात यावे.सदर दरवाढ १५ दिवसाचे आत कमी न झाल्यास भिम टायगर सेना सामाजिक संघटना उमरखेडच्या वतीने अमरण उपोषण करण्यात येईल.अशी लेखी तक्रार भीम टायगर सेना उमरखेड शहराध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर यांनी इमेल द्वारा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यवतमाळ येथे करण्यात आली.


