गजानन जिदेवार आष्टीकर तालुका प्रतिनिधी हदगाव
हदगाव : नांदेड जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व हदगाव तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव तालुक्यामध्ये सन २०२४ ते २०२५ खरीप हंगामा संदर्भात आढावा बैठका मोठ्या प्रमाणात सुरू केल्या आहेत यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करण्यात येत आहे. खरीप पेरणी संदर्भात सोयाबीन उगम क्षमता चाचणी बीज प्रक्रिया. शंख गोगलगाय नियंत्रण, उपाय योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे म.ग्रा.रो.ह. योजने अंतर्गत फळबाग लागवड भाऊसाहेब फुंडकर योजने अंतर्गत फळबाग लागवड योजना बीबीएफ रुंद सरी वरबा पद्धतीने व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड माती नमुने आडणे जमीन आरोग्य प्रतिक्रनुसार खताची शिफारस जमिनीचे माती प्रशिक्षण करणे गुलाबी बोंड आळी नियोजन मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत शेततळे हे संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना हदगाव कृषी विभागामार्फत सज्जा अंतर्गत कृषी सहाय्यकामार्फत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.त्यावेळेस कृषी सहाय्यक बी जी कळसेकर .के बी पाचपुते. कृषी सहाय्यक बिल्लेवाड. कृषी सहाय्यक तावडे. बी व्ही काचेवार. आकाश एकुलवार कृषी पर्यवेक्षक अविनाश पौळ. व मंडळ कृषी अधिकारी पंकज वाकळे उपस्थित होतेमहाराष्ट्र शासनामार्फत पेरणी संदर्भात गडबड न करता चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आव्हान हदगाव तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.”महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.”-तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील