प्रकाश केदारे उपजिल्हा प्रतिनिधी परभणी
दि.२३ मे २०२४महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ परभणी जिल्हा कार्यकारणीच्या वतीने. मानवत ते नाशिक वाया पाथरी माजलगाव गेवराई शेगाव नेवासा फाटा श्रीरामपूर संगमनेर नाशिक तसेच गंगाखेड पालम फळा ही एस.टी.सेवा. सोनपेठ ते छत्रपती संभाजीनगर वाया तेलगाव माजलगाव गेवराई पाचोड छत्रपती संभाजीनगर. हिं एस टी सेवा सुरू करण्यासाठी. मानवत ते अमरावती वाया परभणी हिंगोली वाशिम मंगरूळपीर कारंजा अमरावती.हि एसटी सेवा सुरू करण्यासाठी. महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष नंदकुमार कुलकर्णी. महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष व सल्लागार के डी वर्मा. महासंघाच्या जिल्हा महिला पदाधिकारी श्रीमती शांताबाई उखळकर. यांच्या स्वाक्षरीचे निवेदन परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक यांना दिनांक २२ मे २०२४ रोजी निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात मानवत माजलगाव पाथरी या शहरातून सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचे संबंध संगमनेर येथील कुटुंबबियासी असल्याने. या समाजाच्या कुटुंबीयांना संगमनेर येथे वारं वार जाण्या येण्यासाठी फार अडचणी येत आहे. यासाठी मानवत ते नाशिक वाया पाथरी माजलगाव गेवराई नेवासा फाटा श्रीरामपूर शिर्डी संगमनेर नाशिक हि बस सेवा सुरू करण्यात यावी. याचबरोबर पालम तालुक्यातील श्रीक्षेत्र फळा येथे भाविकांना जाण्यासाठी गंगाखेड पालम फळा हि एसटी सेवा सुरू करण्यासंबंधी. मानवत ते अमरावती एक .टी. सेवा पाच ते सहा वर्षांपूर्वी सुरू होती. आता नव्याने पाथरी मानवत परभणी हिंगोली वाशिम मंगरूळपीर कारंजा मार्गे अमरावती ही बस सेवा सुरू करण्यात यावी. मानवत तेऔसा पाथरी मुदगल सोनपेठ परळी आंबेजोगाई लातूर मार्गे औसा हि एस.टी. सेवा सुरू करण्यासाठी ही निवेदन देण्यात आले.