बापू मुळीक तालुका प्रतिनिधी पुरंदर
अनेक कार्यकर्ते पक्षनिष्ठा पायी आयुष्यभर कार्यरत राहतात. परंतु आपल्या परिसराच्या विकासासाठी आग्रही राहत नाहीत. कार्यकर्त्यांनी परिसराच्या विकासासाठी सातत्याने जागृत राहिले पाहिजे. सर्वसामान्य माणसाला कार्य केंद्रबिंदू मानून कार्यकर्त्यांनी कार्य करावे असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले.हिवरे( ता. पुरंदर) येथे वसंतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित लोकनेते स्व. शिवाजीआप्पा पोमण यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार निरा गावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवी व्यक्तिमत्व राजेश वसंतराव चव्हाण व माजी सरपंच दत्तात्रय कामठे यांच्या स्मरणार्थ हरगुडे गावचे सरपंच भूषण रविंद्रआप्पा ताकवले यांना आदर्श सरपंच पुरस्कार आ.राहुल कुल त्यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे संयोजन वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालींदर कामठे यांनी केले.यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, शामकात भिंताडे ,गंगाराम जगदाळे , संतोष जगताप,एम .के. गायकवाड, शब्बीर शेख, रेखा चव्हाण, तनुजा शहा,ईश्वर बागमार, भानुकाका जगताप, संतोष जगताप , संदिप देवकर, मोहन जगताप, संदीप चिकणे, गणेश मेमाणे , ,म्हस्कू कामठे ,समीर तरवडे, अशोक दळवी, सुदर्शन कुदळे,नंदू गायकवाड ,शंकर कुदळे, चंद्रकांत गायकवाड विनय दगडे, ,स्वप्निल कांबळे , मारुती कामठे,अशोक कामठे, , नंदकुमार चव्हाण, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.जालिंदर कामठे म्हणाले ज्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून समाजाची नियमित सेवा केली. त्याची आठवण ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. शिवाजीआप्पा पोमण व दत्तात्रय कामठे यांचे अनुक्रमे कार्यकर अनुक्रमे कार्यकर्ता व सरपंच म्हणून अप्रतिम कार्य होते.या दोघांचेही अलिकडे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे समाजाची फार मोठी हानी झाली. त्यांच्या स्मरणार्थ ह्यावर्षी पासून आदर्श कार्यकर्ता व आदर्श सरपंच पुरस्कार समारंभ सातत्याने घेतला जाईल.यावेळी अशोक टेकवडे ,शामकांत भिंताडे यांचीही मनोगते झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.के.गायकवाड व शब्बीर शेख यांनी केले. सूत्रसंचालन विकास भोसले यांनी केले. आदर्श कार्यकर्ता परिचयपत्र वाचन दत्तात्रय गायकवाड व रोहिणी गायकवाड यांनी केले. आभार सुनिता रायुडू यांनी मानले.


