१५ जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची देव भेट
बापू मुळीक तालुका प्रतिनिधी पुरंदर
प्रमुख १० मानाच्या पालखी सोहळ्यातील एक सोहळा म्हणजे श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळा. या सोहळ्याचे बुधवारी (दि. ३ जुलै) पंढरपूर आषाढवारीसाठी प्रस्थान होणार आहे. सासवड (ता. पुरदंर) येथे ३ जुलै रोजी लक्ष्मीनारायण मंदिर येथे दिंडी प्रमुखांचे सत्कार, अभंग, पादुका पूजन होऊन भाविकांच्या उपस्थितात मंदिरातून पालखी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मागे काही वेळाने आषाढवारीसाठी प्रस्थान ठेवेल. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाचा जयघोष करीत पालखी सासवड शहरातुन जेजुरी नाका येथे आल्यानंतर येथे प्रदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, आनंदी काकी जगताप, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी, सासवड नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी कैलास चव्हाण आदींसह भाविक सर्व दिंड्यांचे स्वागत करुन आरती होऊन पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती सोहळा प्रमुख जनार्दन तुकाराम वाबळे यांनी दिली. श्रींच्या रथासाठी बैल व्यवस्था बबन दोरगे यवत, नगर खाण्यासाठी बैलगाडी व्यवस्था छबन कुदळे यवत, अश्व व्यवस्था ज्ञानेश्वर काटे बारामती, श्रींचे पुजारी निलेश शिंदे, सेवेकरी सेवेकरी भागवत भूषणकर यांना मान असणार आहे.तारखेनिहाय मुक्कामाचे ठिकाण ३ जुलै खानवडी व पारगाव मेमाणे, ४ जुलै : शिंदवणे (डाळिंब), ५ जुलै : यवत, ६ जुलै : पाटस, ७ जुलै : कुरकुंभ रावणगाव, ८ जुलै : शेटफळगढे, ९ जुलै भिगवण, १० जुलै : डाळज नंबर १, ११ जुलै : इंदापूर, १२ जुलै : सोलापूर जिल्ह्यात प्रवेश महादेव मंदिरामध्ये मुक्काम, १३ जुलै : खंडाळी बोंडले, १४ जुलै : भंडीशेगाव, १५ जुलै : वाखरी, १६ जुलै : पंढरपूर मुक्का, १७ ते २१ जुलै : सोहळा मठामध्ये मुक्काम या ठिकाणी रंगणार रिंगण ७ जुलै : कुरकुंभ रावणगाव येथे पहिले गोल रिंगण. ८ जुलै रांधवणवस्ती येथे पालखीला मेंढरांचे गोल रिंगण. १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता भंडीशेगाव, बाजीराव विहिरीवर सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची देव भेट. १६ जुलै रोजी श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची देव भेट, विठ्ठल पादुका आरती परतीच्या मार्गावरील मुक्काम २१ जुलै रोजी विठ्ठल रुक्मिणीभेटी नंतर दुपारी एक वाजता क्षेत्र सासवडकडे परतीच्या प्रवासाला प्रस्थान ठेवेल. मुक्काचे ठिकाण २१ जुलै : भोडले, २२ जुलै : पीठेवाडी धुळदेव, २३ जुलै लासुर्णे, २४ जुलै बारामती, २५ जुलै : मोरगाव, २६ जुलै : खळद, २७ जुलै : रथासाठी बैल जोडी बबन तात्या दोरगे यवत याना मान मिळाला आहे .नगर खाण्यासाठी बैलगाडी व्यवस्था छबन कुदले यवत याना मान मिळाला आहे.सासवड नगरीत प्रवेश करून लक्ष्मी मंदिर सासवड येथे मानकर यांचा सत्कार समारंभ होऊन या ठिकाणी पालखी सोहळ्याची सांगता होईल अशी माहिती सोहळा प्रमुख जनार्दन तुकाराम वाबळे व उपाध्यक्ष अॅड बापूसाहेब जगताप सोहळ्याचे चोपदार शशिकांत बाळासाहेब जगताप देवस्थानचे पुजारी निलेश शिंदे यांनी दिली.