देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एचएससी बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल ९८.९८ टक्के व कला शाखेचा निकाल ९६.१५ टक्के लागला.विज्ञान शाखेतून सर्वप्रथम गौरव परमेश्वर जाधव ९१ %,व्दितीय वरद विजय देशमाने ९०.३३% व तृतीय अजय बाळू मोहिते ९०.१७% तर कला शाखेतून सर्वप्रथम दिव्या सुनील इंगळे८८%,द्वितीय निकिता देवदास पडूळ ८६.३३ %,तृतीय संगीता दौलत उबाळे ८२.३३%,(वैष्णवी दिपक दसपुते ८९.१७ % लोणार भायगाव ता. अंबड मधून सर्व प्रथम) या विद्यार्थ्यांनी विशेष गुण संपादन करून, प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहे.गजानन उच्च माध्यमिक विद्यालय हसनाबाद येथे बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रविष्ट २०५ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १५० विद्यार्थी विशेष प्रवीण्याने उत्तीर्ण झाले आहे.सर्व विशेष प्राविण्याने तसेच उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे विवेकानंद शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगरचे संस्था अध्यक्ष श्री.अक्षयभाऊ सिसोदे,सचिव श्री.यशोदभाऊ शिसोदे,कोषाध्यक्ष श्री. तुषारभाऊ शिसोदे यांनी अभिनंदन केले.तसेच कॉलेजचे प्राचार्य श्री.एस. एफ.परदेशी सर,पर्यवेक्षक श्री.ए.एम.वाळके सर,कॉलेजचे प्राध्यापक श्री.दिनेश भागवत सर,श्रीमती अलका पुजारी मॅडम,श्री रयाजी मैंद सर व माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.एच.आर. पाटील सर,श्री जोशी सर,श्री सरकटे सर,श्री गुजर सर, ग्राउंड सुपरवायझर श्री.घोडके सर,परीक्षा विभाग प्रमुख श्री वाघ सर,श्री गावंडे सर,श्री किंनगे सर,श्री.यु.बी.देवरे सर,सांस्कृतिक विभागाचे श्री भुरके सर,श्री नेवरे सर,श्री डी.बी.पंडित सर,श्रीमती सोनवणे मॅडम,श्रीमती ताटेवर मॅडम,श्री.ए.डी.इंगळे सर, श्री एस के दाभाडे सर,श्री टी.आर.मेंडके सर,श्री कड सर,श्री पाचपुते सर,श्री. बी बी गायकवाड सर, शिक्षकेतर कर्मचारी श्री श्याम इंगळे,श्री बंडू देवरे या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून,त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या वर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल प्राचार्य श्री.एस.एफ.परदेशी सर यांचे पालक वर्गातून सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.