मोहन चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड/परळी दि: २३ मे २०२४परळी शहरात दिवसातून २५ वेळेस वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार वाढले आहेत, सध्या उन्हाळा सुरू असून ४२ सेल्सिअस तापमान झाले आहे. यामुळे व्यापारी वयोवृद्ध नागरिक महावितरणच्या भोंगळ कारभाराला कंटाळले असून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा लवकरच शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा ईशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज संकाये यांनी दिला. याबाबत एडवोकेट म्हणून सांग काही यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरात गेले कित्येक दिवसापासून परळी शहरामध्ये नागरीकांना तथा आपल्या ग्राहकांना पुर्व कल्पना न देता वारंवार वीज खंडीत केली जात आहे. गेल्या १५ दिवसामध्ये वीज खंडीत होण्याचे प्रमाण चाढल्याचे दिसून येत आहे. काल बुधवारी मोंढा भागातील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता त्याची पुनरावृत्ती आज गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून वीज पुरवठा बंदच आहे. दरम्यान थोड्या प्रमाणात वादळी वारे सुटले की लगेच वीज खंडीत होते. तसेच उन्हाळ्याचे दिवस सुरु असून उष्णेतेची तीव्रता वाढली असून लाईट गुल होण्याचे प्रमाण वाढले असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असून मान्सून पूर्व तयारी कुठेही दिसून येत नाही. तसेच विद्युत तारांवरील झाडांच्या फांद्या तोडून उचलून घेऊन जाव्यात आणि शहरातील विद्युत कार्यालयात नागरिकांचे आलेले फोने उचलावेत तसेच फोन न उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. विद्युत विभागाच्या वतीने नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे त्याचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने जुने पावर हाऊस कार्यालयात लाईट बंद करून मेणबत्ती पेटवून आंदोलन करण्यात येणार आहे. अन्यथा लवकरच शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा ईशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज संकाये यांनी दिला.