स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : पाचगणी येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील युनिकॉन क्रिकेट क्लब कोरेगाव भिमा हा मुलांचा संघ उपविजेता ठरला.द स्पोर्ट्स फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या विद्यमाने पाचगणी येथील अंजुमन विद्यालयाच्या मैदानात चार दिवस ही स्पर्धा उत्साहात पार पडली.या स्पर्धेमध्ये चार संघांनी सहभाग नोंदविला होता.ही स्पर्धा १२, १४, १६ या वयोगटात एकत्रित खेळवण्यात आली होती. यात युनिकॉर्न संघाच्या खेळाडूंनी अनेक वैयक्तिक बक्षिसे पटकावत ग्रामीण भागातुन येऊनही आपल्या गावचा वेगळा ठसा या स्पर्धेत उमटवला. या मध्ये बेस्ट बॉलरची ट्रॉफी राजवर्धन डफळ, बेस्ट विकेटकीपरची ट्रॉफी आदित्य ढेरंगे, बेस्ट फील्डर म्हणून आर्यन जगताप तर बेस्ट इमर्जिंग प्लेयर म्हणून लावण्या हिला गौरवण्यात आले. या स्पर्धेत एकमेव अर्धशतक ठोकणारा खेळाडूही युनिकॉर्न क्रिकेट क्लबचा रुद्र गव्हाणे हा होता.विजेत्या खेळाडूंना संघाचे प्रशिक्षक प्रताप फडतरे सर व ऋषीकेश गव्हाणे सर यांचे मार्गदर्शन लाभले.विजेत्या संघाचे कोरेगाव भिमाचे सरपंच विक्रम गव्हाणे, उपसरपंच सविताताई घावटे, मा. सरपंच अमोल गव्हाणे, मा. उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, गणेश कांबळे, प्रकाशबापू ढेरंगे,अरविंद गव्हाणे,सदस्य केशव फडतरे, अनिकेत गव्हाणे, गणेश फडतरे, शांताराम फडतरे उद्योजक सत्यनारायण ढेरंगे, विराज दाभाडे, संपत गव्हाणे यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.