सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हाअध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तसेच जुन्नर तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वडगाव आनंद या शाळेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत तीन लाख रकमेचे मानकरी ठरली. शाळेची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.वडगाव आनंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना ११ जून १८८३ साली झाली असून, या शाळेत २०११ वर्षांपासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले. या शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शाळेचा अधिकाधिक विकास सीएसआर निधीतून झाला आहे . एम्पथी फाउंडेशन मुंबई, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे सीएसआर पार्टनर मेसर्स मुकुल माधव फाउंडेशन पुणे व रोटरी क्लबच्या विविध शाखांच्या माध्यमातून या शाळेचा खऱ्या अर्थाने कायापालट झालेला दिसत आहेप्रशस्त क्रीडांगण, सुसज्ज इमारत, स्वतंत्र संगणक कक्ष, पिण्याचे आर ओ पाणी, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह ,स्वतंत्र भोजनालय, दप्तर ठेवण्यासाठी स्वतंत्र लॉकर सुविधा, सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली प्रशस्त परसबाग, चिल्ड्रेन बचत बँक ,बालसंसद, गांडूळ खत प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग,बहरलेली आमराई, शालेय बाग, भरपूर क्रीडासाहित्य,अध्यापनासाठी प्रत्येक वर्गात स्वतंत्र ई लर्निंग सुविधा, इंटर ऍक्टिव्ह बोर्ड, बोलका व्हरांडा व संरक्षक भिंत,प्रत्येक वर्गात सी सी टी व्ही कॅमेरे , जॉगिंग ट्रॅक अशा भौतिक सुविधा आहेत.शालेय गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तत्कालीन गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी , गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे व शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ डी बी वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक सुनील ठिकेकर सहशिक्षिका वृषाली कालेकर, संगीता कुदळे, मनीषा इले , गौरी डुंबरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश चौगुले, उपाध्यक्ष संदेश काशिकेदार सदस्य सतीश भिंगारदिवे, सचिन देवकर, वैशाली देवकर, जया देवकर, रेश्मा कुटे,वृषाली चौगुले, ग्रामस्थ व पालक प्रयत्न करीत आहेत.कॉलम साठी(विविध उपक्रम राबविणारी शाळाजुन्नर तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकन शाळा, जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पुरस्कार २०१९ द्वितीय क्रमांक व २०२२ प्रथम क्रमांक प्राप्त शाळा, शैक्षणिक गुणवत्ता अ श्रेणी, शाळा सिद्धी अ श्रेणी, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा ,आय अँम विनर इ. परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळत आहे.. या शाळेत विद्यार्थ्यांचे कलागुण वाढावेत यासाठी विविध उपक्रम ,मोफत योग प्रशिक्षण ,विविध स्पर्धा घेण्यात येतात.