प्रमोद शिंदे तालुका प्रतिनिधी माळशिरस
माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने शैक्षणिक दाखले त्वरित वितरित करावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रांताधिकारी विजया पांगरकर, तहसीलदार सुरेश शेजुळ यांना निवेदन दिले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, शहरप्रमुख पोपटराव शिंदे, प्रभाग ७ चे प्रमुख सनी बरडकर, गटनेते दादाभाई मुलाणी, शामराव लांडगे उपस्थित होते. माळशिरस तालुक्याम ध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. इतर तालुक्यामध्ये त्वरीत दाखले मिळतात तर माळशिरस मध्येच दाखले मिळण्यास उशीर का सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी लागणारा जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्नाचा दाखला काढण्याकरिता विद्यार्थ्यांची अक्षरशः हेळसांड होत आहे. अधून मधून आपले सरकार सेवा केंद्राचे सर्व्हर किंवा इंटरनेट डाऊन राहत आहे. महा ई सेवा केंद्रातून दाखले भरण्यास विलंब होत आहे. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. आणि रात्रभर जागून केंद्र चालकाने दाखले भरले तर तहसिल व प्रांत मधून दाखले सोडण्यास विलंब होत आहे. सर्वच महा ई सेवा केंद्रांवर एकसारखी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये नागरिकांना विविध सरकारी योजनांसाठी लागणाऱ्या दाखल्यामुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी संबंधित अधिका-यांनी याबाबत लक्ष घालून शैक्षणिक दाखले त्वरीत वितरीत करावे अशी मागणी करण्यात आली.