सोहेल खान शहर प्रतिनिधी, पांढरकवडा
स्थानिक शिवरामजी महाविद्यालय येथील कला व विज्ञान या शाखेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहल गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय, दीक्षाभूमी, विधान भवन व लोकमत पेंटिंग प्रेस बुटीबोरी नागपूर येथे संपन्न केली. राज्यशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र अभ्यास मंडळ यांच्या वतीने आयोजित शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी लोकमत प्रिंटिंग प्रेस मध्ये जाऊन वर्तमानपत्र कशाप्रकारे तयार करून छापले जातात याचा अनुभव घेतला. त्यानंतर गोरेवाडा प्राणी संग्रहालय येथे विद्यार्थ्यांनी या आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात असलेल्या विविध वन्य प्राण्यांना पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. देशातील सर्वात मोठे स्तूप असलेल्या दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती घेतली. विधान भवन व झिरो माईल या ठिकाणीही विद्यार्थ्यांनी भेट दिली. नागपूर जवळ असलेल्या या विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट देऊन व या ठिकाणाचा अभ्यास करून माहिती मिळवली. या शैक्षणिक अभ्यास दौऱ्या च्या यशस्वीते करिता राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगेश उगले, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनील चोरे, प्राणिशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. अमर वंजारी, भौतिकशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. रितेश पळसपगार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परिश्रम घेतले.