पंकज चौधरी तालुका प्रतिनिधी रामटेक
शेतकऱ्याला विश्वासात घेत त्याचा अशिक्षित पणाचा फायदा घेऊन खोटे कागदपत्रे तयार करून अशिक्षित शेतकऱ्याची शेती स्वतःच्या नावाने नोंदणी निबंधक कार्यालय कामठी येथे केल्याचा आरोप फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने केले आहे.प्राप्त माहितीनुसार, पांढुर्णा येथील रहिवासी शेतकरी संदीप कृष्णा देवगडे यांच्याकडे वंशपरंपरागत व वडिलोपार्जित मौजा पांढुर्णा येथे शेत सर्व्हे क्रमांक 104/1/1 आराजी 2.43 हेक्टर. खाते क्रमांक 75 हा जुना असून सद्यस्थितीत नवीन शेत सर्व्हे क्रमांक 104/1/1/2/1 आराजी 1.61 हेक्टर असून खाते क्रमांक 985 असे आहे.मात्र शेतकरी हा आदिवासी जमातीचा खातेदार असल्याने त्यांची शेतजमीन गैर आदिवासीला विकणे किंवा हस्तांतरण करणे कायद्याने गुन्हा आहे. असे केल्यास भूमी अधिग्रहण कायद्याच्या कलम 36 (अ) व 36 कलमानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. अशिक्षित शेतकरी संदीप देवगडे यांना गैरअर्जदार मोहम्मद रफिक शेख अब्दुल्ला रा.वर्धमान नगर,नागपूर यांनी विश्वासात घेत दि.31/6/2016 रोजी मुखत्यारपत्र तयार करून घेतले.व सब रजिस्टर नोंदणी कार्यालय क्रमांक 6 नागपूर येथे दस्त क्रमांक 3297/2016 येथे रजिस्टर केले.गैरअर्जदार मोहम्मद रफिक शेख अब्दुल्ला याने मूळ मुखत्यारपत्रात खोडखोड करून खोटी सही व अंगठे लावून काही सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन दि.1/12/2023 रोजी निबंधक कार्यालय कामठी येथे रजिस्टर विक्रीपत्र दस्त क्रमांक 6513/2023 ही मालमत्ता बेकायदेशीर हडपण्याच्या उद्देशाने रजिस्टर केल्याचा आरोप शेतकऱ्याने केले आहे.या फसवणुकीची रीतसर तक्रार मा.पोलीस आयुक्त नागपूर, मा.पोलीस उपायुक्त नागपूर, पोलीस स्टेशन वाठोडा नागपूर, मा.मुद्रांक जिल्हाधिकारी नागपूर, मंडळ अधिकारी,मा.जिल्हाधिकारी नागपूर, मा.आयुक्त आर्थिक गुन्हेशाखा विभाग नागपूर,तहसीलदार यांना केली आहे. तर या फसवणुकीत सहभागी असणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांवर व फसवणूक करणाऱ्या मोहम्मद रफिक शेख अब्दुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल करून फेरफार थांबविण्याची विनंती फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.