गजानन वानोळे ग्रामीण प्रतिनिधी किनवट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागीय मडळ लातूर यांच्याकडून गुरुवार 21 फेब्रुवारी पासून इयत्ता बारावी परीक्षेचे प्रारंभ झाला असून त्यासाठी किनवट तालुक्यातील सहा केंद्रातून 2 हजार 339 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत त्यासाठी किनवट पंचायत समितीचे शिक्षण विभाग सज्ज झाल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी ज्ञानोबा बने यांनी दिली आहे .यासंदर्भात वृत्त असे शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार किनवट तालुक्यात एकूण सहा परीक्षा केंद्र असूनयामध्ये सरस्वती महाविद्यालय किनवट ते ३९७ महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय किनवट 445 बलराम पाटील महाविद्यालय किनवट 650 संत फुलाजी बाबा कनिष्ठ महाविद्यालय उमरी 151 शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पाटोदा 266 सुधाकरराव नाईक निवासी कनिष्ठ महाविद्यालय पळशी तांडा 230 अशी केंद्रनिहाय विद्यार्थी संख्या एकूण2339 परिक्षेस बसले आहे.किनवट तालुक्यातील दोन परीक्षा केंद्र पंचायत समिती शिक्षण विभाग यामधून येत असलेल्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सहस्त्रकुंड 177 व संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय इस्लापूर 538 विद्यार्थी केंद्रनिहाय परिक्षेस बसले आहे या दोन परिक्षा केंद्रावर एकून 715 विद्यार्थी आहे.