प्रकाश कांबरे तालुका प्रतिनिधी हातकणंगले
मौ. वडगांव दि.१९ : जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री व आमदार डॉ विनय कोरे व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप – जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास विभागाच्या २५ : १५ योजनेतून मौजे वडगाव या गावच्या विकास कामांसाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या विकास कामांचा उदघाटन सोहळा दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या शुभहस्ते व लोकनियुक्त सरपंच कस्तुरी अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी आघाडी प्रमुख व माजी सरपंच सतीश चौगुले, श्री दत्त सोसायटी चेअरमन विजय चौगुले, श्री गणेश पाणी पुरवठा माजी चेअरमन धोंडीराम चौगुले हातकणंगले भाजपा तालुका चिटणीस आनंदा थोरवत,माजी ग्रा.पं.सदस्य अविनाश पाटील,माजी उपसरपंच सुनील खारेपाटणे, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश कांबरे,स्वप्निल चौगुले, रघुनाथ गोरड, ग्रा.पं.सदस्या सविता सावंत, दिपाली तराळ, सुवर्णा सुतार, सुनिता मोरे याच बरोबर युवा नेते अमोल झांबरे,लघुउद्योजक अमर थोरवत,महादेव चौगुले,गणेश मगदूम,भिमराव चौगुले, शिवाजी यादव,तानाजी सावंत,राहूल चौगुले यांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.