सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा
अखंड हिंदुस्तान चे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती आख्या महाराष्ट्रभर मोठ्या दिमाखात साजरी होतं आहॆ .या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवप्रेमी हे शिवजन्मभूमीत येत असतात . दि १८ रोजी सायंकाळी आळेफाटा चौक येथून शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्ताच्या अल्पोपहारा ची सोय गेली अनेक वर्षे हरी ओम ग्रुपच्या माध्यमातून केली जात आहॆ .या वर्षी देखील ग्रुपच्या वतीने येणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमी साठी वडापाव आणि चहा ची सोय करण्यात आली होती .आळेफाटा या ठिकाणी सायंकाळी सात ते रात्री दोन वाजेपर्यंत शिवप्रेमीसाठी अल्पोपहारांची सोय करण्यात आली . या उपक्रमाचा अनेक शिवभक्तांनी फायदा घेतला .तसेच अनेकांनी ग्रुपच्या माध्यमातून शिवजन्मभूमीत येणाऱ्या शिवप्रेमींचे स्वागत करण्यात आले ग्रुपच्या वतीने आळेफाटा चौकात शिवरायांची सुबक मुर्ती ठेऊन सुंदर अशी मखर सजविण्यात आली होती .अनेक शिवभक्ताना व शिव कन्यांना या समोर फ़ोटो काढण्याचा मोह आवरला नाही .