प्रमोद अहिनवे तालुका प्रतिनिधी जुन्नर
जुन्नर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती शासकीय परंपरेनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार,मा.खासदार शिवाजी आढळराव पा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,आशाताई बुचके,सत्यशिल शेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, आजी माजी पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवजन्मस्थळी मंत्री महोदयांच्या उपस्थीतीत फुलांनी सजविलेल्या पाळण्यात बाल शिवाजी राजांची मूर्ती ठेऊन पाळण्याची दोरी हलवून पाळणा गीत गाऊन पारंपारीक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या निलम ताजणे, उर्मिला बुट्टे पाटील, शिल्पा गुंजाळ, उर्मिला ढोले, रूपाली महाबरे यांनी पाळणा म्हटला. यानंतर जन्मोत्सवानिमीत्त सर्वांना सुंठवडा व प्रसाद वाटप करण्यात आले.


